Join us

मुंबईकरांसाठी विकेंड थंडा थंडा कूल कूल...मान्सून आला रे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 11:17 AM

अखेर मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

मुंबई - अखेर मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे. गुरुवारी (7 जून) धो-धो बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर शुक्रवारी (8 जून) मुंबईकरांची सकाळही आनंदधारांच्या वर्षावात न्हाऊन निघाली. मात्र,नंतर पावसानं हुलकावणी दिली. पण अखेर आज मुंबईमध्ये मान्सून दाखल्याची माहिती हवामान खात्यानं जाहीर केली. सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 40 मिनिटे आणि पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, 8 ते 12 जूनपर्यंत मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Live Updates :

 

 

सायन रेल्वे स्थानक

- मुंबईत शनिवारी सकाळपासून दमदार पावसाची हजेरी, मुंबई शहर, मध्य मुंबई, पूर्व उपनगरांत गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस

ठिकाण - वरळी 

 

 

- दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी

(Rains Live Updates : मुंबईसह कोकणात 12 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

- पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम, मध्य रेल्वे तब्बल अर्धा तास उशिरानं, प्रवाशांना मनस्ताप

- विक्रोळी आणि कांजुरमार्ग स्थानकांच्या दरम्यान झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेवर अचानक ब्लॉक, लोकल गाड्या कमी असल्यामुळे लोकलच्या फेऱ्या रद्द, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

(गोव्यात पावसाचा धडाका कायम, अतिवृष्टीची शक्यता)

मराठवाड्याला जोरदार तडाखा

मान्सूनने मराठवाड्याला तडाखा दिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (8 जून) पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. औसा, निलंगा व देवणीसह लातूर जिल्ह्यात 22 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात पावसामुळे लेंढी नदीवरील पूल पाण्यात गेला व पाच गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. 

 

टॅग्स :मुंबईचा पाऊसमान्सून 2018