Join us

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या 24 तासांत मान्सून होणार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 2:13 PM

मुंबईत मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे. येत्या 24 तासांत मान्सूनचं मुंबईत आगमन होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई - कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने गुरुवारी दुपारी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्रातील मान्सून आगमनाची सरासरी तारीख 10 जून आहे. यंदा हा प्रवेश एक दिवस उशिराने झाला. याानंतर आता येत्या 24 तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे. 

मुंबईत मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे. येत्या 24 तासांत मान्सूनचं मुंबईत आगमन होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सूनचा दक्षिणेकडून पश्चिमेकडे प्रवास सुरू आहे. मान्सूनचा आतापर्यंत हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया येथेपर्यंत प्रवास झाला आहे. पुढच्या 24 तासांत महाराष्ट्रातील सर्व भागात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून येणार, येणार म्हणत चकवा देणारा मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला. येत्या दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज आहे.

कर्नाटकचा उर्वरित भाग, संपूर्ण रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा, छत्तीसगडचा काही भाग, नागालँडचा मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशचा काही भाग, आसाम आणि मेघालयाच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन ते तीन दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारी भाग, तेलंगणा, गोव्यासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबईतही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

टॅग्स :मुंबईपाऊसमहाराष्ट्र