Mumbai Rains Updates : ...अन् 'तो' तुफान बरसला; ताशी ६० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:30 AM2021-07-21T11:30:14+5:302021-07-21T12:55:44+5:30

Mumbai Rains Updates : मरीन ड्राइव्ह, गिरगाव, वरळी, वांद्रे, माहीम, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, गोरेगाव, साकीनाका, कुर्ला, सायन, बी के सी, विद्या विहार, घाटकोपर आणि लगतच्या परिसरात बुधवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Mumbai Rains Updates the speed of rain is 60 km per hour in mumbai | Mumbai Rains Updates : ...अन् 'तो' तुफान बरसला; ताशी ६० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस कोसळला

Mumbai Rains Updates : ...अन् 'तो' तुफान बरसला; ताशी ६० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस कोसळला

Next

मुंबई : शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता समुद्राला भरती असतानाच मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोर पकडला. समुद्रकिनारी वेगाने लाटा धडकत असतानाच दुसरीकडे वारा ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत होता. याच काळात मरीन ड्राइव्ह, गिरगाव, वरळी, वांद्रे, माहीम, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, गोरेगाव, साकीनाका, कुर्ला, सायन, बी के सी, विद्या विहार, घाटकोपर आणि लगतच्या परिसरात बुधवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईत सरासरी दहा ते पंधरा मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

बुधवारी बँक हॉलिडे असल्यामुळे बहुतांश मुंबईकर घरीच होते. त्यामुळे रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शिवाय खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होती. तुलनेने बुधवारी रस्त्यावर तुरळक गर्दी असल्याने फार काही कोणाला त्रास झाल्याचे चित्र होते. मात्र काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना मुसळधार पावसाने झोडपले होते. सकाळी साडेदहा वाजता पावसाने आपला जोर किंचित कमी केला. मात्र पावणे अकरा वाजता मुंबईवर पावसाचे काळेकुट्ट ढग जमा झाले. आणि क्षणातच वेगाने पावसाचे टपोरे थेंब मुंबईवर कोसळू लागले. याच काळात वारा देखील वेगाने वाहत असल्याने पावसाने रौद्र अवतार धारण केला. तब्बल पंधरा एक मिनिटे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. मुंबईच्या उपनगरात सकाळी अकराच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना काही काळ धडकी भरवली. विशेषतः अकरा वाजता पावसाने धुमाकूळ घातल्याने जणू काही मुंबईत तुंबेल की काय? अशी भीती देखील नागरिकांना वाटू लागली. सुदैवाने सव्वा अकराच्या सुमारास पावसाचा जोर किंचित कमी झाला. पावसाचा जोर कमी होताच घरात बसलेले मुंबईकर पुन्हा एकदा काहीतरी कामाचे औचित्य साधत पुन्हा एकदा घराबाहेर पडले. 

Web Title: Mumbai Rains Updates the speed of rain is 60 km per hour in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.