Mumbai Rain Updates : पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते, विमान वाहतुकीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 12:33 PM2019-07-08T12:33:32+5:302019-07-08T13:07:37+5:30
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे.
मुंबई - मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेवरील लोकलदेखील 15 ते 20 मिनिटे तर हार्बर 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहेत. तर काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत. वांद्रे कलानगर, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, परेल, असल्फा या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Mumbai: Water logging and traffic jam in parts of the city following heavy rainfall. #Maharashtrapic.twitter.com/cYkM8AMyAS
— ANI (@ANI) July 8, 2019
सध्या मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. मात्र पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत आहे. मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
#UPDATE MIAL PRO: Due to heavy rains, the visibility is changing every minute. Since 9:15 am, the visibility at the airport is fluctuating. There is a delay due to weather. No cancellation as of now but 3 diversions took place till now. https://t.co/FdKmO4vYdV
— ANI (@ANI) July 8, 2019
अंधेरीच्या महाल इंडस्ट्रियल परिसरात भिंत कोसळल्याची माहिती मिळत आहे. 'मुंबईकरांनो, मागील काही तासांपासून मुंबईमध्ये खास करून पूर्वी उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे. तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पावसाची तीव्रता आता कमी झाले आहे. आमचे कर्मचारी साचलेले पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आपले सहकार्य मोलाचे आहे' असे ट्वीट मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
Mumbai: Rainfall leads to water-logging in Andheri Subway. #Maharashtrapic.twitter.com/K8QD0DjNCD
— ANI (@ANI) July 8, 2019