Mumbai Rape Case: मुंबई बलात्कार प्रकरणाबाबत आता नेमकं काय करता येईल? देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 01:40 PM2021-09-11T13:40:41+5:302021-09-11T13:41:21+5:30
Mumbai Rape Case: मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे.
Mumbai Rape Case: मुंबईतीलसाकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरण माणुसकीला आणि मुंबईच्या आजवरच्या लौकिकाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. अशी प्रकरणं वारंवार होत राहिली तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीसांनी यावेळी याप्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्ला देखील दिला आहे.
मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू
"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि पोलिसांनी याप्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा तातडीनं शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत", असं फडणवीस म्हणाले.
CCTV: मुंबईतील साकिनाक्यातील बलात्कार प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, नराधम कॅमेरात कैद pic.twitter.com/bH2xERBn64
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2021
मुंबईच्या लौकिकाला काळीमा फासला गेला
मुंबईत रात्री-अपरात्री देखील कधीच महिलांना अडचण येत नाही असा लौकिक मुंबईचा संपूर्ण देशभरात आहे. पण साकिनाक्याच्या घटनेनं या लौकिकाला काळीमा फासला गेला आहे. याची तात्काळ दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. आरोपींना काय शिक्षा द्यावी हा कोर्टाचा विषय असला तरी याप्रकरणात नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात नेमकं काय चाललंय याचीही माहिती घ्यायला हवी. महिला सुरक्षाबाबतच्या उपाययोजनेंवर भर द्यायला हवा. सरकारला महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यासही फुसरत नाही", असा निशाणा फडणवीस यांनी राज्य सरकारवर साधला.