Mumbai Rave Party On Cruise: 'भानुशाली, गोसावीनं कायदेशीर पद्धतीनंच मदत केली, आरोप बिनबुडाचे'; NCB चं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:27 PM2021-10-06T18:27:57+5:302021-10-06T18:29:25+5:30

Mumbai Rave Party On Cruise: आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. 

Mumbai Rave Party On Cruise manish Bhanushali and kiran Gosavi helped in a legal way allegations are baseless says NCB | Mumbai Rave Party On Cruise: 'भानुशाली, गोसावीनं कायदेशीर पद्धतीनंच मदत केली, आरोप बिनबुडाचे'; NCB चं स्पष्टीकरण

Mumbai Rave Party On Cruise: 'भानुशाली, गोसावीनं कायदेशीर पद्धतीनंच मदत केली, आरोप बिनबुडाचे'; NCB चं स्पष्टीकरण

Next

Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीनं (NCB) उधळून लावली होती. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan arrested) याच्यासह एकूण ११ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर वेगळच वळण मिळालं आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात गेल्या चार दिवसांत एनसीबीनं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. मुंबईतील जोगेश्वरी भागात आज एनसीबीनं छापा टाकला. यात १५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून अब्दुल शेख नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या मोहक जयस्वालनं दिलेल्या माहितीच्या आधारे आज हा छापा टाकण्यात आला होता. यासोबतच क्रूझवरील पार्टीच्या आयोजनाप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली. 

एनसीबीच्या कारवाईत वैयक्तिकरित्या मदत केलेल्या साक्षीदारांचीही माहिती यावेळी देण्यात दिली. एनसीबीनं काही व्यक्तींची नावं जाहीर केली. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचीही नावं घेतली. "क्रूझवर टाकलेल्या छाप्यासाठी काही जणांनी आम्हाला माहिती देण्याचं काम केलं होतं. संपूर्ण कारवाई कायदेशीर पद्धतीनंच झालेली आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणूनही आम्हाला काही जणांनी मदत केली आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही", असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 

काय म्हणाले होते नवाब मलिक?
क्रूझ शिप ड्रग्ज पार्टीवरील कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संशय व्यक्त करत एनसीबीच्या संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी भाजपचा पदाधिकारी काय करत होता? भाजप आणि एनसीबीचा नेमका संबंध काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केले. आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटोदेखील दाखवले.

क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हताच, असं एनसीबीनं नंतर सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असं मलिक म्हणाले.

आणखी वाचा:

पुढचं 'टार्गेट' शाहरुख खान, महिनाभरआधीच पत्रकारांना मिळाले होते निरोप; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
आर्यनला घेऊन जाणारा NCBचा अधिकारी नाही, मग तो नेमका कोण?, नवाब मलिकांनी कुंडलीच मांडली!

Web Title: Mumbai Rave Party On Cruise manish Bhanushali and kiran Gosavi helped in a legal way allegations are baseless says NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.