मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ नागरिकांना मदत करता यावी, यासाठी मुंबई महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आखला आहे. आराखड्यानुसार, मुंबई महापालिकेचा प्रत्येक विभाग संकटांशी सामना करण्यासाठी सज्ज असून, महापालिकेने उर्वरित घटकांचीही मदत घेतली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदलासह उर्वरित घटकांचा यात समावेश आहे.महत्त्वाचे म्हणजे, आजारांचा सामना करण्यासाठीही पालिकेने रुग्णालये सज्ज ठेवली असून, मुंबई शहरात ६३, पूर्व उपनगरात ७४ आणि पश्चिम उपनगरात ८८, अशी २२५ ठिकाणे पावसाचे पाणी भरण्याची संभाव्य ठिकाणे म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. येथे पाणी साचल्यास त्याचा त्वरित निचरा करण्यासाठी २९८ उदंचन संचांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक उदंचन संच चालकाकडे भ्रमणदूरध्वनी देण्यात आला असून, समन्वयाकरिता पंप चालकांच्या प्रतिनिधींची आसन व्यवस्था मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे. महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या ७३, शासनाच्या अखत्यारित असलेल्या ६० व खासगी ५५५ अशा एकूण ६८८ इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे. इमारतींची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इमारती रिकाम्या करण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होत असलेल्या आजारांबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रतिबंधक उपाययोजनांची परिपत्रके काढण्यात आली आहेत. पाणी आणि अन्न याबाबत सुरक्षितता व वैयक्तिक विषयांवर भित्तीपत्रके तयार करून ती शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानके व झोपड्यांमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहेत. महापालिकेचे दवाखने, सर्व रुग्णालयांत पुरेशी साधनसामुग्री आणि औषधांचा साठा सज्ज ठेवण्यात आला आहे. साथीच्या आजाराकरिता कस्तुरबा रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे.>चौपाट्यांवरमाहिती फलकगिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी, आक्सा चौपाटी, गोराई चौपाटी येथे एकूण ३६ जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्सून कालावधीत समुद्रात ४.५ मीटरपेक्षा उंच लाटांची भरती असणारे दिवस, याची माहिती चौपाट्यांवर लावण्यात आली आहे.>२९९ धोकादायक ठिकाणांची पाहणीदरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या २९९ ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्याचे धोकादायक, अतिधोकादायक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. दरडी कोसळून हानी होऊ नये, म्हणून संरक्षक भिंती बांधण्यासह म्हाडा प्राधिकरणास सूचित करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.>५८ ठिकाणांना जोडणारी बिनतारी यंत्रणाशासनाचे ५ हजार आणि पालिकेचे २३८ सीसीटीव्हीपर्यायी संदेशवहन म्हणून हॅम रेडिओसुनिश्चित कार्यपद्धती आणि आपत्कालीन व्यवस्थापन आराखडे६० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रे१४ आणीबाणी मदत यंत्रणाआणीबाणी मदत निधीकरिता २४ विभागातील सहायक आयुक्तांना आकस्मिक मदतीकरिता एक लाख रुपयांचा निधीपूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याकरिता २० जीवरक्षक तराफेनौदलाची ८ पथके मुंबईत तैनात, यामध्ये २ गोताखोर पथकेराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या अंधेरी क्रिडा संकुल येथे तैनातप्रत्येक पथकात अधिकारी व जवान मिळून ४५ इतके मनुष्यबळआपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणामुख्यालयातील आणीबाणी कृती केंद्र : वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरतहॉट लाइन्स : विविध यंत्रणांच्या नियंत्रण कक्षांना थेट जोडतील अशा हॉटलाइन्सइतर हॉट लाइन्स : महापालिकेची २४ विभाग कार्यालये, मनपाची ५ व महाराष्ट्र शासनाचे १ अशा ६ सर्वसाधारण रुग्णालयास जोडत असलेल्या थेट हॉट लाइन्स>धोकादायक संभाव्यविभाग ठिकाणेशहर ३८पूर्व उपनगर २१९पश्चिम उपनगर ३३
आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:19 AM