योग दिनासाठी मुंबईकर सज्ज

By admin | Published: June 21, 2017 03:03 AM2017-06-21T03:03:36+5:302017-06-21T03:03:36+5:30

तिसरा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यास मुंबईकर सज्ज झाले आहेत. योग दिनानिमित्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वांद्रे येथे

Mumbai is ready for yoga day | योग दिनासाठी मुंबईकर सज्ज

योग दिनासाठी मुंबईकर सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तिसरा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यास मुंबईकर सज्ज झाले आहेत. योग दिनानिमित्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वांद्रे येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वांद्रे प्रोमोनेड येथे सकाळी पावणेसात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांमध्ये योग दिन साजरा
करावा, असे पत्रक शाळांमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, शाळांमध्ये योग दिनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पावणेसातला शिक्षणमंत्री विनोद तावडे धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १० हजार विद्यार्थी ३०० महाविद्यालयांत योग दिन साजरा करणार आहेत. तसेच विद्यापीठाने तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते. दिव्यराज फाउंडेशनतर्फेही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर योगा करणार आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उमरखाडी येथील मुलींचे निरीक्षण गृहामधील महिला व मुलींसोबत सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत.

Web Title: Mumbai is ready for yoga day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.