मुंबईत २३०.३ मिमी पावसाची नोंद; वाऱ्याचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:05+5:302021-05-19T04:06:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोव्यासह महाराष्ट्राच्या किनाऱ्याला जोरदार तडाखा दिला असून, मुंबईत चक्रीवादळामुळे ...

Mumbai receives 230.3 mm of rainfall; The wind continues to blow | मुंबईत २३०.३ मिमी पावसाची नोंद; वाऱ्याचा जोर कायम

मुंबईत २३०.३ मिमी पावसाची नोंद; वाऱ्याचा जोर कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोव्यासह महाराष्ट्राच्या किनाऱ्याला जोरदार तडाखा दिला असून, मुंबईत चक्रीवादळामुळे सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २३०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी झाडे काेसळल्याने माेठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मदत सेवा दूरध्वनी क्रमांक १९१६ वर या काळात नागरिकांचे विविध तक्रारींबाबत आणि माहिती विचारण्याबाबत ९८१७ फाेन आले. मुंबई शहर आणि उपनगराला सोमवारी दिवसभर झोडपून काढणाऱ्या चक्रीवादळाच्या पावसाने रात्री उशिरा विश्रांती घेतली. गुजरातला चक्रीवादळ धडकल्यानंतर मुंबईत पावसाचा जोर ओसरला. शिवाय, वाऱ्याचा वेगही किंचित कमी झाला. मंगळवारी किंचित कुठे तरी आलेली सर वगळता दिवसभर पावसाने मुंबईत विश्रांती घेतली. परंतु सकाळसह दुपारी वाऱ्याचा जोर बऱ्यापैकी होता. संध्याकाळी मात्र पावसासह वाऱ्यानेही विश्रांती घेतली.

* वरळीत वडाचे झाड कोसळून महिलेचा मृत्यू

वरळी येथे वडाचे झाड कोसळून संगीता खरात (४५) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. के. ई. एम. रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

* सर्वाधिक पावसाची नोंद (मिमी)

वरळी २५४

हाजीअली २४०

फोर्ट २२०

भायखळा २०३

विक्रोळी १२९

कुर्ला ११८

भांडुप ११७

कांदीवली ३२०

दहिसर २९२

गोरेगाव २८१

* सर्वाधिक वाऱ्याचा वेग (ताशी किमी )

कुलाबा ११४

फोर्ट ८३.७

कुर्ला ६२

मालवणी १०१.४

मरोळ ७५.६

वर्सोवा ६६

* एकूण तक्रारी

पाणी तुंबणे ५६

बांधकाम कोसळले ४३

शॉर्टसर्किट ३९

झाडांच्या फांद्या पडणे २३६४

बोटींचे अपघात २

-----------

Web Title: Mumbai receives 230.3 mm of rainfall; The wind continues to blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.