सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 06:20 AM2023-09-09T06:20:05+5:302023-09-09T06:20:12+5:30

कुलाबा वेधशाळेत ५०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Mumbai recorded 111 mm of rain in 24 hours | सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद

सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद

googlenewsNext

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना श्रावण सरी अपेक्षित असतानाच पावसाची गुरुवारी सकाळपासून संततधार सुरू झाली. शुक्रवारी दुपारी २ ते ३ यादरम्यान मुंबईत ठिकठिकाणी कोसळलेल्या पावसामुळे पाणी तुंबले होते.  मात्र, पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याने पाणी ओसरू लागले. गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत १११.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, कुलाबा वेधशाळेत ५०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या ४८ तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच हवामान खात्याने मुंबईला शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला आणि पाऊस धोधो कोसळला. विशेषत: दुपारी शहर व उपनगरांत पडलेल्या तुफान पावसामुळे मुंबईचा चक्का जाम होतो की काय, असे चित्र निर्माण झाले. मात्र, पावसाने चारनंतर हात आखडता घेतला आणि मुंबईकर थोडक्यात बचावले. दरम्यान, अंधेरी सब वे येथे काही काळ दुपारी पाणी साचले होते. उदंचन संचाद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आला आणि वाहतूक सुरू झाली.

कुठे पडला किती पाऊस
गोवंडी     ९६ मिमी
मालवणी     ७६ 
चिंचोळी     ७४ 
मरोळ     ७० 
गोरगाव     ६८
चेंबूर     ६० 
विक्रोळी     ५९ 
कुर्ला     ५४ 

Web Title: Mumbai recorded 111 mm of rain in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.