Join us

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच, आज तब्बल ३,०६२ नव्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 8:32 PM

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच असून आज नव्यानं आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजाराचा आकडा ओलांडला आहे.

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच असून आज नव्यानं आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजाराचा आकडा ओलांडला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३,०६२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचं कारण ठरताना दिसत आहे. (Mumbai records 3062 fresh corona cases in the last 24 hours)

मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ५५ हजार ८९७ इतकी झाली आहे. तर मृत्यूंचा आकडा ११ हजार ५६५ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १० जणांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. यातील ८ जणांना कोरोनासोबतच इतर सहव्याधी देखील होत्या. तर तीन जण चाळीशीच्या खालच्या वयाचे आहेत. 

मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या

मुंबईत गेल्या २४ तासांत १,३३४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण ९१ टक्के असल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. तर कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा वेग १२४ दिवस इतका आहे. मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणं अॅक्टीव्ह कन्टेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर एकूण ३०५ इमारती सील आहेत.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई