मुंबई : मुंबईत गुरुवारी दिवसभरात ८ हजार ९३८ रुग्ण आणि २३ मृत्यूंची नोंद झाली आहे. रुग्नांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आता शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ४ लाख ९१ हजार ६९८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ८७४ झाला आहे.शहर उपनगरात दिवसभरात ४ हजार ५०३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ५१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ८० टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ८६ हजार २७९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७१ असून, ७५० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३९ हजार २७० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.मुंबईत दिवसभरात ४८ हजार ९०२ कोरोनाच्या आतापर्यंत ४४ लाख ५४ हजार १४० चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७१ असून, ७५० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३९ हजार २७० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.राज्यात मृत्यूदर कमी होतो आहेजानेवारी २०२१- १.६९ टक्केफेब्रुवारी २०२१ – ०.८२ टक्केमार्च २०२१ – ०.३७ टक्के१ एप्रिल ते ७ एप्रिल – रुग्ण ३ लाख ६० हजार २८१मृत्यू २००३ ( मृत्यूदर ०.५५ टक्के बदलापूरला १९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण १४ हजार ८३ असून, एकही मृत्यू नाही. आता मृत्यूंची संख्या १२६ कायम आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १४४ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही. या गावपाड्यांत २१ हजार ७८५ बाधित झाले आहेत.
CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईत कोरोनाचा आलेख काहीसा घसरता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:26 AM