मुंबई पुन्हा तापली; कमाल तापमान ३६ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:52 AM2019-06-10T06:52:18+5:302019-06-10T06:52:36+5:30

रहिवासी हैराण : राज्यात पावसासह उष्णतेच्या लाटेचा खेळ सुरुच

Mumbai reopens; Maximum temperature is 36 degrees | मुंबई पुन्हा तापली; कमाल तापमान ३६ अंशांवर

मुंबई पुन्हा तापली; कमाल तापमान ३६ अंशांवर

Next

मुंबई : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर हवामानामध्ये झपाट्याने बदल नोंद होत आहेत. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ उठणार असतानाच दुसरीकडे विदर्भाला दिलेला उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कुठे उष्णतेची लाट कायम असून, कुठे जोरदार पाऊ स सुरू आहे. हवामानात हे बदल नोंदविण्यात येत असतानाच मुंबईकरांच्या डोक्यावरचा सूर्य आग ओकत आहे. ऐन रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३६.३ अंश इतके नोंद झाले असून, आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांना आणखी घाम फोडू लागले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र, लगतच्या लक्षद्वीप व पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

पावसाचा इशारा
१० जून : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
११ ते १३ जून : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
१० ते ११ जून : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.

मुंबईसाठी अंदाज
च्सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंशांच्या आसपास राहील.
च्वर्धा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे हवामान उष्ण राहील. तर नांदेड, यवतमाळ आणि नागपूर येथे एक-दोन ठिकाणी हलका पाऊस होईल.
च्कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर महाराष्ट्रात किंचित वाढेल. तसेच औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि यवतमाळ येथे पाऊस पडेल.

स्कायमेट म्हणते : चक्रीवादळ ‘वायू’
चक्रीवादळ तयार झाल्यास हे हंगामातील तिसरे आणि अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ असेल. त्याला ‘वायू’ असे नाव दिले जाईल. यापूर्वी चक्रीवादळ फोनी बंगालच्या खाडीत विकसित झाले. ते ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. मान्सून हंगामादरम्यान चक्रीवादळ तयार होणे ही एक दुर्मीळ बाब आहे. मात्र मान्सूनच्या कमकुवत लाटेमुळे वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.

हलक्या पावसाची नोंद
सिक्किम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, दक्षिण केरळ, अंदमान-निकोबार बेटासह ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, कर्नाटक किनारा, हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Mumbai reopens; Maximum temperature is 36 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई