Mumbai: गोखले ब्रिजचे दुरुस्ती आणि रखडलेले बांधकाम निराशाजनक, संजय निरुपम यांचे टिकास्त्र

By मनोहर कुंभेजकर | Published: June 12, 2023 06:33 PM2023-06-12T18:33:46+5:302023-06-12T19:08:43+5:30

Sanjay Nirupam: काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी मनपा अधिकार्‍यांसोबत आज अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वपूर्ण गोपाळ कृष्ण गोखले ब्रिज दुरुस्ती पाहणी दौरा केला. दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेला गोखले ब्रिज आणि त्याचे रखडलेले बांधकाम याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

Mumbai: Repairs and stalled construction of Gokhale Bridge disappointing, comments Sanjay Nirupam | Mumbai: गोखले ब्रिजचे दुरुस्ती आणि रखडलेले बांधकाम निराशाजनक, संजय निरुपम यांचे टिकास्त्र

Mumbai: गोखले ब्रिजचे दुरुस्ती आणि रखडलेले बांधकाम निराशाजनक, संजय निरुपम यांचे टिकास्त्र

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - गेल्या नोव्हेंबरपासून गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अंधेरीसह जुहू, वर्सोवा ते जोगेश्वरी पर्यंतच्या परिसरातील अनेक मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. अंधेरी पश्चिम आणि जुहू येथील कमीतकमी ५ लाख नागरिकांना हायवेवर ये-जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी मनपा अधिकार्‍यांसोबत आज अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वपूर्ण गोपाळ कृष्ण गोखले ब्रिज दुरुस्ती पाहणी दौरा केला. दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेला गोखले ब्रिज आणि त्याचे रखडलेले बांधकाम याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

गेल्या दि,७ नोव्हेंबर पासून अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अंधेरीसह जुहू, वर्सोवा ते जोगेश्वरी पर्यंतच्या परिसरातील अनेक मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. अंधेरी पश्चिम आणि जुहू,सात बंगला, यारी रोड,वर्सोवा येथील कमीतकमी ५ लाख नागरिकांना हायवेवर ये-जा करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही विभागाची परवानगी न घेता ब्रिज पाडण्यात आला, त्यानंतर संबंधीत विभागाची परवानगी घेण्यासाठी बराच काळ वाया गेला अशी टिका त्यांनी केली.

गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय कोणतेही नियोजन न करता घाईघाईने घेण्यात आलेला आहे. मागील २ महिन्यापर्यंत रेल्वेची परवानगी नव्हती, मार्च २०२३ मध्ये रेल्वेने परवानगी दिली, असे माझ्या निदर्शनास आले. पूलाची हळूहळू पुनर्बांधणी केली जात आहे. याचा परिणाम पुलाच्या पुनर्बांधणीवर होत आहे, गोखले पूलाच काही भाग २०१८ मध्ये कोसळल्यानंतर ऑडिट अहवालात पूल पाडून नव्याने उभारणी करण्यात यावी असे कुठेही म्हंटलेले नाही, पूलाच्या ऑडिट अहवालानुसार त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे, असे संजय निरुपम म्हणाले.

माझी सरकारकडे मागणी आहे की, संबंधीत विभागांची परवानगी न घेता ब्रिज का पाडण्यात आला? कोणतेही नियोजन न करता पूल वाहतुकीसाठी का बंद केला? रेल्वेच्या परवानगीला उशीर का झाला? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.

Web Title: Mumbai: Repairs and stalled construction of Gokhale Bridge disappointing, comments Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.