मुंबई : दिवसागणिक शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत चालली आहे. राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे दिसून आल्याने कोरोनाचा कहर कायम आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शहर उपनगरात बुधवारी १० हजार ४२८ रुग्ण आणि २३ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४ लाख २८ हजार ७६० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ८५१ आहे. सध्या मुंबईत ८१ हजार ८८६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३५ दिवसांवर आला आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.९१ टक्के झाला आहे. तर दिवसभरात ६ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३ लाख ८८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.शहर उपनगरात बुधवारी ५१ हजार २६३ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४४ लाख ५ हजार २३८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्स ७२ असून सक्रिय सीलबंद इमारतींची सख्या ७८९ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३५ हजार ८४० अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.सात दिवसांत ६२ हजारांहून अधिक रुग्ण७ एप्रिल १०,४२८६ एप्रिल १०,०३०५ एप्रिल ९८५७४ एप्रिल ५२६३३ एप्रिल ९०९०२ एप्रिल ८८३२१ एप्रिल ८६४६एकूण - ६२,१४६ठाणे जिल्ह्यात सहा हजार २९० रुग्ण ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जबरदस्त वाढू लागला आहे. बुधवारी सहा हजार २९० नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता तीन लाख ५६ हजार २६७ रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ६२० झाली आहे.ठाणे शहर परिसरात एक हजार ६१९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ८८ हजार ९०८ झाली आहे. शहरात पाच मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या एक हजार ४८० झाली आहे. पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही संख्या वाढतीच असून, याठिकाणी एक हजार ७२८ रुग्णांची वाढ झाली असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत एक हजार ४१६ रुग्णांची वाढ झाली असून, चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १७३ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. भिवंडीत १४८ बाधित असून, दोन मृत्यूची नोंद आहे. मीरा-भाईंदरमध्ये ५२२ रुग्ण आढळले असून, तिघांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ३०४ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू नोंद आहे. बदलापूरमध्ये २४० रुग्णांची नोंद झाली असून, एका मृत्यूची झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १४० नवे रुग्ण वाढले आहेत. आता बाधित रुग्णसंख्या २१,६४१ झाली. तर आतापर्यंत ६१६ मृत्यूंची नोंद आहे.
CoronaVirus News: मुंबईत 10 हजारांहून अधिक रुग्ण, तर 23 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 4:02 AM