Join us

Mumbai Corona Updates: मुंबईत आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली, बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:58 PM

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीवर नियंत्रण मिळाल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीवर नियंत्रण मिळाल्याचं दिसून येत आहे. मुंबईत आज पुन्हा एकदा २ हजाराच्या खाली रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १९४६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २०३७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर आलं आहे. (mumbai reports 1946 new COVID19 cases 68 deaths and 2037 recoveries in the last 24 hours)

मुंबईत सध्या ३८ हजार ६४९ सक्रीय रुग्ण आहेत. तर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी १८९ दिवसांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे ६ ते १२ मेपर्यंतचा रुग्णवाढीचा दर अवघा ०.३६ टक्के इतका नोंदवला गेला आहे. 

मुंबईतील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६ लाख ८४ हजार ४८ इतका झाला आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६ लाख २९ हजार ४१० इतकी झाली आहे. मुंबईतील आतापर्यंतचा मृत्यूंचा आकडा ९४ हजार ७६ इतका झाला आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस