Join us

Mumbai Corona Updates: मुंबईत आज तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण; संकट दिवसागणिक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 6:52 PM

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा ५६३१ इतका होता.

मुंबई-

मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा ५६३१ इतका होता. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही आता झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत सध्या २२ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार राज्य सरकार आणि महापालिका करत आहे. राज्यात लॉकडाऊनचा विचार सध्या नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईची वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहात येत्या काही दिवसांत निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची दाट शक्यता आहे. 

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५१ दिवसांवर आला आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९५ टक्के इतकं आहे. मुंबईत सध्या १० कन्टेनमेंट झोन आहेत. तर १५७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत ४७ हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका