Join us

CoronaVirus News: आता दुबईहून या... निर्बंध असणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:21 AM

नव्या नियमावलीनुसार दुबईसह संयुक्त अरबअमिरातीतून येणाऱ्या प्रवाशांना आता कोणतीही विशेष ‘एसओपी’ लागू राहणार नाही.

मुंबई : दुबईसह संयुक्त अरब अमिरातीतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे गृहविलगीकरण आणि विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणीतून सूट देण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.२९ डिसेंबरच्या नियमावलीनुसार, उपरोक्त देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी केली जात होती. शिवाय त्यांना सात दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक होते. सातव्या दिवशी पुन्हा चाचणी केली जात होती. रविवारी मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर करीत या प्रवाशांना दिलासा दिला.नव्या नियमावलीनुसार दुबईसह संयुक्त अरबअमिरातीतून येणाऱ्या प्रवाशांना आता कोणतीही विशेष ‘एसओपी’ लागू राहणार नाही. जोखीम नसलेल्या गटांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असलेल्या मार्गदर्शिकेचे त्यांना पालन करावे लागेल. १७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या