मुंबई- गोरेगाव पूर्व येथील साई मार्गावर गेले काही दिवस सीवरेज चे काम चालू आहे त्यामुळे ह्या रस्त्यावर खोदकाम आणि गटार नव्याने बांधण्याचे काम चालू आहे. हे काम कासवाच्या चाली प्रमाणे धिमे चालू आहे, तसेच रस्त्याची देखील दुर्दशा झाली. त्यामुळे येथील नागरिकांना वाहने चालविणे सोडाच पण पायी चालताना देखील खूप त्रास आणि अडथळा होत आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक ५२ च्या भाजप माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी सर्व गोष्टींची पाहणी केली, आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला सज्जड दम दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी ५जून २०२४ पर्यंत रस्ता व्यवस्थित करतो असे आश्वासन दिले.
परंतु नागरिकांना होणारा त्रास पाहून प्रीती सातम यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला की, दिलेल्या तारखेपर्यंत साई मार्ग व्यवस्थित नाही झाला तर पी दक्षिण विभागाच्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, रस्ता रोको करून नागरिकांच्या त्रासाला वाचा फोडतील.
या पाहणी दोऱ्यात संबंधित महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि गोकुळधाम मधील रहिवाशी उपस्थित होते.