Mumbai Sakinaka Rape Case: मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:21 PM2021-09-11T12:21:21+5:302021-09-11T12:22:16+5:30
Mumbai Rape Case: सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
Mumbai Rape Case: सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. पण ज्या अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाले होते त्याचं वर्णनही करता येणार नाही. अतिरक्तस्त्राव झाल्यानं पीडितेची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आज रुग्णालयात तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.
CCTV: मुंबईतील साकिनाक्यातील बलात्कार प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, नराधम कॅमेरात कैद pic.twitter.com/bH2xERBn64
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2021
पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापौर पेडणेकरांनी दिली होती. पण तिचा अखेर मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक नराधम गजागाड असून यात आणखी काहींचा समावेश होता का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे.