मुंबई: बुडणा-या जहाजावरून ८ खलाशांना वाचवलं
By admin | Published: December 26, 2015 10:05 AM2015-12-26T10:05:57+5:302015-12-26T11:52:31+5:30
मुंबईजवळील मुरूड किना-याजवळ समुद्रात बुडणा-या जहाजावरून ८ खलाशांना वाचवण्यातत तटरक्षक दलाच्या जवानांना यश मिळाले
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबईजवळील मुरूड किना-याजवळ समुद्रात बुडणा-या जहाजावरून ८ खलाशांना वाचवण्यातत तटरक्षक दलाच्या जवानांना यश मिळाले. काल संध्याकाळी ही घटना घडली असून बचावलेले सर्व खलाशी गुजरातमधील असल्याचे समजते.
एसएसव्ही सरोजिनी हे जहाज शुक्रवारी संध्याकाळी गुजरातच्या पोरबंदरमधून केरळच्या बेयपोर इथे ४३० टन सोड्याची पावडर घेऊन जात होतेस त्यावर गुजरातचे आठ खलाशी होते. मात्र मुरुडपासून १२ नॉटिकल मैल आणि मुंबईपासून अंदाजे ५० किमी अंतरावर आले असता त्या जहाजाच्या एका भागातून इंजिन रूममध्ये पाणी घुसण्यास सुरूवात झाली. खलाशांनी संध्याकाळी सुमारे ६.४५च्या सुमारास स कोस्ट गार्डला या प्रकाराबाबत कळवून मदत मागितली. ही माहिती ३० मैल दूर असलेल्या तटरक्षक दलाच्या गस्तीवर असलेल्या सम्राट जहावरील जवानांना देण्यात आली असता त्यांनी तातडीने बचाव मोहिम सुरू केली. संध्याकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेली ही बचाव मोहिम रात्री १० वाजता यशस्वीरित्या संपली. सव्वा तीन तासांनंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी आठ खलाशांची सुटका करून त्यांना मुंबईत आणले.