मुंबईतील शालेय विद्यार्थी अयांश आणि निशिताची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 09:26 PM2024-06-30T21:26:50+5:302024-06-30T21:27:36+5:30
या दोन्ही खेळाडूंना त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच भाऊसाहेब दिघे यांचे मार्गदर्शन लाभत असून, पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबचे सेक्रेटरी हितेश कल्याणभाई शहा यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
मुंबई - सब जूनियर व जूनियर महाराष्ट्र राज्य डायव्हिंग निवड चाचणी स्पर्धा दिनांक 8 व 9 जून २०२३ रोजी मुंबई येथे पार पडल्या. या स्पर्धेत पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबच्या दोन खेळाडूंची दिनांक 7 ते 11 जुलै 2024 दरम्यान इंदौर येथे होणार्या 49 व्या सब ज्युनिअर आणि 50 व्या ज्युनिअर नॅशनल ऍक्वायटी चॅम्पियनशिप 2024 साठी निवड झाली आहे.
यामध्ये अयांश केजरीवाल हा कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल मुंबई मध्ये इयत्ता सहावीत शिकत असून डायव्हिंग मधील ग्रुप 3 मध्ये हायबोर्ड या क्रीडा प्रकारात, तर निशिता ठाकूर ही दि अलेक्झांडर गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन मुंबई मध्ये इयत्ता आठवीत शिकत असून तिची डायव्हिंग मधील ग्रुप 3 मध्ये 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोन्ही खेळाडूंना त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच भाऊसाहेब दिघे यांचे मार्गदर्शन लाभत असून, पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबचे सेक्रेटरी हितेश कल्याणभाई शहा यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम यश मिळावे याकरिता पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.