Join us

Mumbai Schools Closed: मोठी बातमी! मुंबईतील शाळा उद्यापासून ३० जानेवारीपर्यंत राहणार बंद; पालिका आयुक्त चहल यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 4:26 PM

Mumbai Schools Closed: इयत्ता १० वी. व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणाऱ्या व्यवस्थापनाच्या तसेच माध्यमाच्या शाळा ४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

मुंबई-Mumbai Schools Closed: मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता शहरातील इयत्ता १० वी. व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणाऱ्या व्यवस्थापनाच्या तसेच माध्यमाच्या शाळा ४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

विद्यार्थ्यांचे तथापि इयत्ता १ ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरू राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खासगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलावता येणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशाळामुंबई महानगरपालिका