मुंबई- 1993मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटा(Mumbai serial blast)तील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी (Terrorist Jalees Ansari) गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देणारा दहशतवादी जलीस अन्सारी सापडत नाहीये. जलीसवर 50 हून अधिक साखळी बॉम्बस्फोटांचा आरोप आहे. शुक्रवारी दहशतवादी जलीस अन्सारीच्या पॅरोलची मुदत संपणार होती. आज जलीसला अजमेर तुरुंगात पोहोचायचं होतं. परंतु गुरुवारी सकाळपासूनच तो गायब झाला आहे.
मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 07:36 IST
1993मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटा(Mumbai serial blast)तील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी (Terrorist Jalees Ansari) गुरुवारी मुंबईतून गायब झाला.
मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरार
ठळक मुद्दे1993मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 21 दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे.