Join us  

BREAKING: मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला बजावली नोटीस, अजामीनपात्र वॉरंट जारी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 2:31 PM

कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्थींवर जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई-

कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्थींवर जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंबई सत्र न्यायालयानं आता राणा दाम्पत्याविरोधात कारणे द्या नोटीस बजावली आहे. कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या विरोधात अजमीनपात्र वॉरंट का जारी केलं जाऊ नये? यावर उत्तर देण्यास राणा दाम्पत्याला बजावण्यात आलं आहे. 

राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयानं जामीन देताना काही अटी घालून दिल्या होत्या. यात राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरीही काल आणि आज राणा दाम्पत्यानं प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देत ठाकरे सरकावर जोरदार हल्लाबोल केला. राणा दाम्पत्याच्या याच कृतीची दखल कोर्टानं घेतली असून त्यांच्याविरोधात नोटीस जारी केली आहे. 

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी देखील सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याविरोधात अर्ज दाखल केला असून दोघांनी प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य करुन अटींचं उल्लंघन केलं आहे असं नमूद केलं आहे. जामीन देताना घालून देण्यात आलेल्या अटी त्यांनी पाळलेल्या नाहीत त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावे असे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. 

राणा दाम्पत्य दिल्लीतठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्ली गाठली आहे. मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांच्याबाबतची तक्रार दिल्लीत करणार असल्याचं राणा दाम्पत्यानं सांगितलं होतं. त्यानुसार दोघंही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठा दिल्लीला रवाना झाले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्र्याच्या दडपशाही सरकार विरोधात कारवाई होत नाही तोवर दिल्लीतून परत येणार नाही असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणामुंबई पोलीस