Mumbai Corona Updates: दादर मार्केटमध्ये ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह!, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:32 PM2021-03-23T15:32:35+5:302021-03-23T15:33:12+5:30

Mumbai Corona Updates: मुंबई महानगरपालिकेनं शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) करण्यास सुरुवात केल्यानंतर दादरमधून एक मोठी माहिती समोर आली आहे.

Mumbai Seven Dadar market hawkers test positive for coronavirus during random testing | Mumbai Corona Updates: दादर मार्केटमध्ये ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह!, परिसरात खळबळ

Mumbai Corona Updates: दादर मार्केटमध्ये ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह!, परिसरात खळबळ

googlenewsNext

Mumbai Corona Updates: मुंबई महानगरपालिकेनं शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) करण्यास सुरुवात केल्यानंतर दादरमधून एक मोठी माहिती समोर आली आहे. दादरच्या सुप्रसिद्ध भाजी मार्केटमध्ये जवळपास सात फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे दादर मार्केट परिसरात खळबळ उडाली आहे. 

दादर स्टेशन परिसरात सोमवारी ६७ फेरीवाल्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यातील सात जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सातही जणांना आता क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. (Mumbai: Seven Dadar Market Hawkers Test Positive For Coronavirus During Random Testing)

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी आणि फुल मार्केट हे अतिशय प्रसिद्ध मार्केट असून येथे दैनंदिन पातळीवर गर्दी पाहायला मिळते. कोविड १९ संदर्भातील नियमांचं पालन करण्याचं वारंवार आवाहन केलं जात असतानाही दादर परिसरातील बाजारात नियमांचं सर्सारपणे उल्लंघन होत असल्यानं लक्षात आलं आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं महापालिकेच्यावतीनं शहरातील मॉल्स, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं आणि बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड निगेटीव्ह रिपोर्ट देखील बंधनकारक करण्यात आला आहे. 

मुंबईत वाढता वाढे कोरोना
मुंबईत सोमवारी तब्बल ३,२६० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ६५ हजार ९१४ इतकी झाली आहे. तर मृत्यूंचा आकडा ११ हजार ५९२ वर पोहोचला आहे. सध्या मुंबईत २५ हजार ३७२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 
 

Read in English

Web Title: Mumbai Seven Dadar market hawkers test positive for coronavirus during random testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.