Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता संपली, रुग्ण वेटिंगवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:34 PM2021-03-19T14:34:43+5:302021-03-19T14:36:39+5:30

Mumbai Corona Updates: मुंबई उपनगरातील कोविड-१९ साठीचं पालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या 'सेव्हन हिल्स हॉस्पीटल'मधील (Seven Hills Hospital) सर्व बेड आता रुग्णांनी व्यापले आहेत.

Mumbai Seven Hills Hospital packed beyond capacity | Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता संपली, रुग्ण वेटिंगवर

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! सेव्हन हिल्स रुग्णालयाची क्षमता संपली, रुग्ण वेटिंगवर

Next

Mumbai Corona Updates: मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई उपनगरातील कोविड-१९ साठीचं पालिकेचं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या 'सेव्हन हिल्स हॉस्पीटल'मधील (Seven Hills Hospital) सर्व बेड आता रुग्णांनी व्यापले आहेत. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे २८८७ नवे रुग्ण वाढले तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Mumbai Seven Hills Hospital packed beyond capacity)

"आमच्या रुग्णालयात १५५० बेड्स आहेत आणि सध्या पूर्णपणे भरले आहेत. एकही बेड शिल्लक नसून अनेक रुग्ण अॅडमिट होण्यासाठी वेटिंगवर आहेत", असं सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितलं. 

कोरोना बाधितांची संख्या उपनगरात विशेषत: अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली भागात वाढत आहे. या भागासाठी सेव्हन हिल्स रुग्णालय अतिशय महत्वाचे रुग्णालय आहे. तेच रुग्णालय आता फुल झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. पण महापालिकेचे अधिकारी मात्र मुंबईत बेड्सची कुठेही कमतरता नाही असा दावा करत आहेत. 

एकट्या मुंबईत सध्या १८ हजार सक्रीय रुग्ण
मुंबईत सध्या १८ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाख ५२ हजार ८३५ वर पोहोचला आहे. यातील ३ लाख २१ हजार ९४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृत्यूंचा आकडा ११ हजार ५५५ इतका आहे. 
 

Web Title: Mumbai Seven Hills Hospital packed beyond capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.