शरद पवारांची प्रमुख नेत्यांसोबत होणार बैठक, नालासोपाऱ्यातील स्फोटकांचे प्रकरण अजेंड्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 11:17 AM2018-08-26T11:17:17+5:302018-08-26T11:37:20+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

Mumbai : sharad pawar calls meeting may discuss on nalasopara bomb criminal action | शरद पवारांची प्रमुख नेत्यांसोबत होणार बैठक, नालासोपाऱ्यातील स्फोटकांचे प्रकरण अजेंड्यावर?

शरद पवारांची प्रमुख नेत्यांसोबत होणार बैठक, नालासोपाऱ्यातील स्फोटकांचे प्रकरण अजेंड्यावर?

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (27 ऑगस्ट) पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. नालासोपारा-साताऱ्यात त्यांच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे यावर पार्टीची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

(नालासोपारा स्फोटकांप्रकरणी घाटकोपरमधून एकाला अटक)

दरम्यान, नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार (३०) याला शुक्रवारी रात्री राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमध्ये अटक केली. बॉम्ब बनविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. राऊतसह अटक केलेल्या इतरांनी बॉम्बद्वारे विविध ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट आखला होता. त्यात पवार सहभागी असल्याच्या शक्यतेतून एटीएसने तपास सुरू केला आहे. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी ही पाचवी अटक आहे.

घाटकोपर भटवाडी परिसरात पवार आईसोबत राहतो. त्याच्या बहिणीचा विवाह झाला आहे. त्याचे स्थानिक शाळेतच शिक्षण झाले. त्याने पाइप फीटरचा डिप्लोमा केला आहे. त्याने माझगाव डॉकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. तेथेच भरतीदरम्यान त्याला नोकरी मिळाली. त्याचबरोबर त्याने नुकताच आॅनलाइन भाजी विक्रीचाही व्यवसाय सुरू केला होता. तो शिवभक्त आहे. शिवज्योत घेऊन पायी गडावर जाणे आदी उपक्रमांत त्याचा पुढाकार असे. तो राहत असलेल्या परिसरात संभाजी भिडे यांचे शिवप्रतिष्ठानचे कार्यालय आहे. येथील कार्यक्रमांनाही त्याची हजेरी असे. अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांच्या तो दोन वर्षांपासून संपर्कात होता. त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात पवारचाही सहभाग समोर आला आहे.

३१ पर्यंत पोलीस कोठडी
अविनाश पवारला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या घरातून सीपीयू, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

माझगाव डॉकही होते निशाण्यावर?
माझगाव डॉक हे देशातील एक महत्त्वाचे जहाजबांधणीचे ठिकाण आहे. तेथे नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या बनवतात. तेल उत्खननासाठी आवश्यक जहाजेही बनविली जातात. तेथेही स्फोट घडविण्याचा कट रचला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai : sharad pawar calls meeting may discuss on nalasopara bomb criminal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.