मुंबई विमानतळावर शिवसैनिक खवळले; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:54 PM2021-08-02T15:54:22+5:302021-08-02T15:55:31+5:30

शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येते अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. यामुळे हे सहन केले जाणार नाही.

Mumbai Shivsena workers vandalized Adani Airport signboard mumbai international airport | मुंबई विमानतळावर शिवसैनिक खवळले; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला

मुंबई विमानतळावर शिवसैनिक खवळले; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला

googlenewsNext

मुंबई- मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या एअरपोर्टचे  संचालन आता अदानी ग्रुपकडे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एअरपोर्टवर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’च्या बोर्डची तोडफोड केली आणि तो उखडून फेकून दिला आहे.

शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येथे अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. हे सहन केले जाणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नाव असताना 'अदानी एअरपोर्ट', असे नाव येथे लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय कामगार सेनेने अदानी एअपोर्ट नाव काढून टाकले, असे भारतीय कामगार सेनेचे सचिव संजय कदम यांनी म्हटले आहे.


अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांचे संचालन आता अदानी समूहाकडे आहे. जुलै महिन्यात मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समूहाकडे आहे. स्वतः गौतम अदानी यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती.

काय म्हणाले होते अदानी -
मुंबई विमानतळाचे टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले होते, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईचा गौरव वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ.

अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.


 

Read in English

Web Title: Mumbai Shivsena workers vandalized Adani Airport signboard mumbai international airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.