‘मुंबई श्री’ची रंगत २५ फेब्रुवारीला

By admin | Published: February 21, 2017 03:44 AM2017-02-21T03:44:16+5:302017-02-21T03:44:16+5:30

अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेची चुरस २५ फेब्रुवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे रंगणार

'Mumbai Shree' will be painted on 25th February | ‘मुंबई श्री’ची रंगत २५ फेब्रुवारीला

‘मुंबई श्री’ची रंगत २५ फेब्रुवारीला

Next

मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेची चुरस २५ फेब्रुवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील महापालिका निवडणूकीमुळे शरीसौष्ठव स्पर्धेला आर्थिक पाठिंबा देणारे अनेक राजकीय पुरस्कर्ते यंदा दूर राहिल्यानंतर या स्पर्धेत खेळाडूंवरील बक्षिसांची रक्कम कमी होणार नसल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. त्यामुळेच मुंबईतील सर्वच प्रमुख शरीरसौष्ठवपटूंनी मुंबई श्रीचा किताब पटकावण्यासाठी कंबर कसली आहे.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होत असलेली ‘मुंबई श्री’ स्पर्धा देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा स्पर्धा असून यातून शरीरसौष्ठवपटूंना घसघसीत कमाई करण्याची संधी आहेच, त्याचबरोबर या स्पर्धेतूनच आगामी ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची निवड होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड होणार असल्याने शरीरसौष्ठवपटूंमध्ये कडवी चुरस पहायला मिळेल.
‘मुंबई श्री’ पटकावण्यासाठी जबरदस्त टक्कर होणार असून सुनीत जाधव, सागर कातुर्डे, स्वप्नील नरवडकर, प्रमोद सिंग आणि नितीन म्हात्रे हे आंतरराष्ट्रीयस्तराचे शरीरसौष्ठवपटूंमधील लढत लक्षवेधी ठरेल. मुळात या बलाढ्य खेळाडूंचे लक्ष्य महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे असून अनेकदा जेतेपद हातातून निसटलेला प्रतिक पांचाळ, संतोष भरणकर, श्रीनिवास खारवी, अरुण नेवरेकर, विलास घडवले, सकिंदर सिंग, श्रीदीप गावडे, आशिष काळोखे आणि निलेश दगडे यांसारखे अनेक खेळाडू किताब पटकावण्यासाठी आव्हान निर्माण करतील. (क्रीडा प्रतिनिधी)

स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात येईल. प्रत्येक गटातील अव्वल ५ क्रमाकांना अनुक्रमे १०, ८, ६, ४ आणि २ हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येतील.

राजकीय पुरस्कर्त्यांच्या माघारीनंतरही आम्ही या स्पर्धेच्या आयोजनाचे आव्हान स्वीकारले आहे. ज्या कारणामुळे मुंबई श्री स्पर्धा ओळखली जाते, तीच ओळख कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक संकट असूनही बक्षिस रक्कमेवर कोणताही परिणाम होऊ न देता किताब विजेता नक्की लखपती होईल.
- अजय (नंदू) खानविलकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना

Web Title: 'Mumbai Shree' will be painted on 25th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.