मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:43 IST2018-01-10T15:40:28+5:302018-01-10T15:43:24+5:30
मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद
मुंबई - मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.
माघी गणेशोत्सवनिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (10 जानेवारी) 14 जानेवारीपर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही.
मात्र, यादरम्यान भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सोमवारी 15 जानेवारीला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्यातून दर्शन घेता येईल, असंही आदेश बांदेकर यांनी सांगितलं.