Mumbai: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथे सहा जण समुद्रात बुडाले, दोघांन वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 18:43 IST2023-06-12T18:43:10+5:302023-06-12T18:43:38+5:30
Mumbai: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथे मोठी दुर्घटना घडली असून, येथील समुद्रामध्ये सहा जण बुडाले आहेत. यापैकी दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे.

Mumbai: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथे सहा जण समुद्रात बुडाले, दोघांन वाचवण्यात यश
मुंबईतील जुहू कोळीवाडा येथे मोठी दुर्घटना घडली असून, येथील समुद्रामध्ये सहा जण बुडाले आहेत. यापैकी दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे. तर चार जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या चार जणांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळी महानगरपालिका, पोलीस यांसह इतर यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. ही दुर्घटना आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास घडली आहे.