मुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यात लढत सुरु आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही राहुल शेवाळे या मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकवणार की काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना जनाधार मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 421711 मते पडली आहेत. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 271059 मते पडली आहेत.
दरम्यान, 2009 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी सुमार 3 लाख 81 हजार मते मिळवून काँग्रेसच्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या पराभव केला होता. गायकवाड यांना सुमार 2 लाख 42 हजार मते पडली होती. आता पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार आमनेसामने आले.