दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019 : शिवसेनेने गड राखला, राहुल शेवाळे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 07:27 PM2019-05-23T19:27:17+5:302019-05-23T19:31:35+5:30
Mumbai South Central Lok Sabha Election 2019 : गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने झेंडा फडकवला आहे.
मुंबई : यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईचा गड राखला आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. शिवसेनेचे उमेवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना 424913 मते पडली आहेत. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 272774 मते पडली आहेत.
या मतदारसंघात मनसे फॅक्टर चालला नाही. कारण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद मुंबईतील निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांच्या सभांचा करिष्मा चालला नाही. येथील जनतेने अखेर पुन्हा एकदा राहुल शेवाळेंना निवडणून दिले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रतिष्ठित अशा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
दरम्यान, 2009 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी सुमार 3 लाख 81 हजार मते मिळवून काँग्रेसच्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या पराभव केला होता. गायकवाड यांना सुमार 2 लाख 42 हजार मते पडली होती. आता पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार आमनेसामने आले.