Mumbai: भटक्या जमाती, नवमतदारांमध्ये मतदानाची जागृतीसाठी उपनगरात विशेष शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:14 PM2024-01-25T22:14:58+5:302024-01-25T22:16:13+5:30

Mumbai News: २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि वांद्रे पूर्व विधानसभा निवडून कार्यालयाने एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी विशेष शिबिर आणि नवमतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यात आली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Mumbai: Special camp in suburbs for voting awareness among nomadic tribes, new voters | Mumbai: भटक्या जमाती, नवमतदारांमध्ये मतदानाची जागृतीसाठी उपनगरात विशेष शिबिर

Mumbai: भटक्या जमाती, नवमतदारांमध्ये मतदानाची जागृतीसाठी उपनगरात विशेष शिबिर

- श्रीकांत जाधव
मुंबई - २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि वांद्रे पूर्व विधानसभा निवडून कार्यालयाने एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी विशेष शिबिर आणि नवमतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यात आली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपनगरातील १७६ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात डावरी नगर, वाकोला सांताक्रुझ पूर्व येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. निवासी उप जिल्हाधिकारी सातिश बागल, मतदार नोंदणी अधिकारी जगत सिंग गिरासे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी मंगेश मयेकर, तहसीलदार राजाराम टवते, नायब तहसीलदार महारुद्र वारे यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार मानसी मार्लेवार यांनी राष्ट्रीय मतदार दिवस प्रतिज्ञा वाचून उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उद्ग घोषित केली.

तसेच मतदार नोंदणी अधिकारी जगत सिंग गिरासे यांनी १८ वर्षे पुर्ण झालेले नव मतदार, तृतीय पंथी, दिव्याग मतदार यांना त्याचे ओळख पत्र व पुषपगुच्छ देवून स्वागत केले. त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देत सोबत त्यांचे मित्रं मैत्रिणीपैकी निदान एक तरी नवीन मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आपुलकीने आवाहन केले.

तर टीव्ही मालिकेत काम करणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप डोईफोडे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी नवं मतदार, दिव्यांग मतदार, तृतीय पंथी मतदार यांना आजच्या दिवसाचे महत्त्व व मतदानाचे महत्व पटवून दिले व इतर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आवाहन केले. 

Web Title: Mumbai: Special camp in suburbs for voting awareness among nomadic tribes, new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई