दहावी-बारावीच्या परीक्षेत मुंबईची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:11 AM2018-05-15T07:11:09+5:302018-05-15T07:11:09+5:30

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)कडून घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई व बारावी आयसीएस परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

Mumbai stays in Class-XII examination | दहावी-बारावीच्या परीक्षेत मुंबईची बाजी

दहावी-बारावीच्या परीक्षेत मुंबईची बाजी

Next

मुंबई : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)कडून घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई व बारावी आयसीएस परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईकरांनी आपला झेंडा उभारला आहे. बारावीच्या परीक्षेत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती देशात पहिला आला आहे.

तर दहावीत कोपरखैरणेच्या सेंट मेरी शाळेतील स्वयं दास देशात पहिला आला आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९८.५१ टक्के तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.२१ टक्के लागला. विशेष म्हणजे १२वीच्या परीक्षेत एकूण ७ विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले आहे. या वर्षी आयसीएसईची परीक्षा २६ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला १०.८८ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १२वीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.६३ टक्के तर मुलांचे ९४.९६ टक्के इतके आहे. १०वीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.९५ टक्के आणि मुलांचे ९८.१५ टक्के इतके आहे.

१२वीत मुंबईच्या लीलावतीबाई पोदार हायस्कूलमधील अभिज्ञान चक्रवर्ती याने बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ७ विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी मुंबईचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर १७ विद्यार्थी असून त्यातही २ विद्यार्थींं मुंबईचे आहेत. तिसºया क्रमांकावर २५ विद्यार्थी असून त्यातही २ विद्यार्थी मुंबईचे आहेत. आयसीएस दहावीच्या परीक्षेतही मुंबईच्या मुलांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कूलच्या स्वयं दास याने ९९.४४ टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नरसी मोनजी स्कूलची अनोखी मेहता हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गोरेगाव येथील विबग्योर स्कूलची निधी धनानी व विश्रुती शाह, बॉम्बे स्कॉटिश स्कूलची सरनाथा कोरिया, पोदार हायस्कूलचा सार्थक मित्तल तर ग्रेगोरिअस हायस्कूलची वेदिका मनेक यांनी तिसºया क्रमांकावर येण्याचा मान पटकवला आहे.
>ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची विद्यार्थिनी आणि रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी भारत शितोळे यांची मुलगी रेवती शितोळे ही बारावीच्या परीक्षेत ९९ टक्के मिळवून देशात तिसरी आली आहे. तानसा शाह - ९९. ५० % बारावी परीक्षेत प्रथम - द कॅथेड्रल अ‍ॅण्ड जॉन कॅनन हायस्कूल, मुंबई
मी खूप आनंदी असून मला खरेतर अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. माझ्या या यशात माझे आई-वडील आणि शाळा यांचा वाटा मोठा आहे. पुढे विधि शाखेत करिअर करायचे असे मी ठरविले आहे.प्रिया खजांची, ९९. २५% बारावी परीक्षेत द्वितीय - लीलाबाई पोदार स्कूल, मुंबई
मला चार्टर्ड अकाउंटिंगमध्ये करिअर करायचे आहे. माझ्या या यशात माझ्या आईवडिलांसह शिक्षक, मित्रपरिवार यांचाही तेवढाच सहभाग आहे. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर अभ्यासासाठी कधी दबाव आणला नाही.विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्याचे मत स्वयं याने व्यक्त केले. स्वयंचे वडील संजीब दास हे एका खासगी कंपनीत सायंटिस्ट म्हणून नोकरी करतात, तर आई शाळेत शिक्षिका आहे. त्या-त्या विषयांचा नियमित अभ्यास हेच त्याच्या यशाचे गमक असल्याची प्रतिक्रिया त्याचे वडील संजीब दास यांनी दिली आहे.९९.५० टक्के मिळाल्याने माझे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मला आधीपासून केमिस्ट्री या विषयात विशेष रुची आहे, माझ्या यशाचे श्रेय विशेषत: मी माझ्या आईला आणि आजीला देईन.
- अभिज्ञान चक्रवर्ती, लीलाबाई पोदार स्कूल, मुंबई

Web Title: Mumbai stays in Class-XII examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.