मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:11 AM2024-11-07T08:11:50+5:302024-11-07T08:12:40+5:30

Mumbai Suburban Railway: पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस आणि खार उपनगरीय स्टेशनला जोडणारा पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. सुमारे ३१४ मीटर लांबीच्या या पुलाची रचना जुन्या स्वरूपाची असून तेथे नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे.

Mumbai Suburban Railway: Bandra-Khar Pedestrian bridge to be broken for commuters, schedule of Harbor on Western Railway will be disrupted for 6 months | मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार

मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार

 मुंबई  - पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस आणि खार उपनगरीय स्टेशनला जोडणारा पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. सुमारे ३१४ मीटर लांबीच्या या पुलाची रचना जुन्या स्वरूपाची असून तेथे नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ९१८ कोटी रुपयांच्या या मार्गिका विस्तारामुळे मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे.

खार आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान मार्गिकेचा विस्तार करण्यात येत आहे. या कामामुळे पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक जवळपास ६ महिने विस्कळीत राहणार आहे.

प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होणार
या कालावधीत सीएसएमटी ते गोरेगाव अशी अखंड मार्गिका सुरू न राहता ती गोरेगाव ते खार आणि छत्रपती शिवाय महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते वांद्रे  अशी सुरू राहील. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
त्यातही या कामात मोठा अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस व  खार स्थानकाला जोडणारा पूल तोडला जाणार आहे. त्यामुळे विस्ताराचे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी ६ महिन्यांनी कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक समस्यांमुळे विलंब
- पाचव्या आणि सहाव्या मार्गाचा विस्तार प्रकल्प क्षेत्रात मशीद असल्यामुळे जमीन संपादित करण्यात अडचण येत आहे.
- पादचारी पूल आणि अन्य स्थानिक समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. या समस्येवर तोडगा काढून प्रकल्पाचे काम जलदगतीने करता यावे, यासाठी रेल्वेने हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम आराखडा लवकरच 
- वांद्रे-खार विभागातील हार्बर लाईन कमीत कमी कालावधीसाठी बंद ठेवण्याची रेल्वेची योजना आहे. हा कालावधी ६ महिन्यांपर्यंत कमी करण्यासाठी रेल्वेने पुन्हा नियोजन केले आहे.
- त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना या कामाचा कमीत कमी फटका बसणार आहे.  सध्या, रेल्वेने प्री-ईओआय (इनिशिअल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच अंतिम आराखडा निश्चित होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Mumbai Suburban Railway: Bandra-Khar Pedestrian bridge to be broken for commuters, schedule of Harbor on Western Railway will be disrupted for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.