वाडिया हॉस्पिटलमध्ये 8 वर्षांच्या मुलाला मिळाली नवसंजीवनी,मोठी शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:02 PM2018-11-15T13:02:57+5:302018-11-15T13:07:09+5:30

परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात 8 वर्षांच्या मुलाच्या हाताचे कार्य सुरळीत करणारी एक विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

Mumbai : successful microvesicular hand surgery on 8 year old child at Wadia hospital | वाडिया हॉस्पिटलमध्ये 8 वर्षांच्या मुलाला मिळाली नवसंजीवनी,मोठी शस्त्रक्रिया यशस्वी

वाडिया हॉस्पिटलमध्ये 8 वर्षांच्या मुलाला मिळाली नवसंजीवनी,मोठी शस्त्रक्रिया यशस्वी

Next

मुंबई : परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात 8 वर्षांच्या मुलाच्या हाताचे कार्य सुरळीत करणारी एक विलक्षण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. साप चावल्यानंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे ताल्हा उमर शेख याच्या डाव्या हातात व्यंग निर्माण झाले होते.  नांदेड येथील ताल्हा या 8 वर्षांच्या मुलाला खेळण्यांशी खेळायचे होते. ती खेळणी कपाटाच्या मागील बाजूस ठेवली होती. कपाटाच्या मागे साप दडून बसला असेल, याची त्याला कल्पनाच नव्हती. जेव्हा त्याने आपले खेळणे काढायला कपाटाच्या मागे हात घातला तेव्हा सापाने त्याला दंश केला. त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्याला सर्पदंशावरील उताऱ्याचे इंजक्शन दिले. काही दिवसांनी दिसून आले की, डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला आणि डाव्या हातात संसर्ग फैलावला. हात कापावा लागेल, हा एकच पर्याय तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हात वाचवण्यात डॉक्टरांना यश आले पण जखम बरी होण्यास विलंब लागला. जखमेवर कोणतेही आवरण देण्यात आले नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकुचन झाले होते आणि डावे मनगट व हातामध्ये व्यंग निर्माण झाले. या व्यंगावर काही उपचार करता येईल का?, याची चाचपणी करण्यासाठी त्याचे पालक त्याला वाडिया रुग्णालयात घेऊन आले.

बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले, "जेव्हा रुग्ण माझ्याकडे आला तेव्हा त्याला त्याच्या व्यंग असलेल्या हाताने कोणेतीही उपयुक्त कृती करता येत नव्हती. डाव्या हाताच्या पृष्ठभागावर त्वचा व स्नायूंचा नेक्रॉसिस (ऊतिनाश) झाला होता आणि मनगट ते कोपरापर्यंतच्या हातामध्ये व्यंग निर्माण झाले होते. व्यंगावर उपचार करण्यासाठी, आकुंचन पावलेली त्वचा मोकळी करण्यासाठी आणि मायक्रोव्हॅस्क्युलर फ्री टिश्यु ट्रान्सफर करून हे वैगुण्य दूर करण्यासाठी आम्ही शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. मुलांवरील मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी गुंतागुंतीची आणि दुर्मीळ असते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया केवळ अद्ययावत टर्शरी आरोग्य सुविधा असलेल्या केंद्रांमध्येच होऊ शकते.  
 
"व्रण गंभीर आणि मोठा होता. त्यामुळे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली. मनगट व हाताची पूर्ण हालचाल व्हावी हे आमचे ध्येय होते. डाव्या प्रकोष्ठावरील (मनगट ते कोपरापर्यंतचा हात) आणि हातावरील जाड थर झालेला व्रण कापण्यात आला. डाव्या मनगटाचे काठीण्य आणि संकुचन मोकळे करण्यात आले आणि हाताची पूर्ण हालचाल साध्य करण्यात आली. डाव्या मांडीवरील त्वचा व मऊ उतीचा फ्लॅप (पट्टा) काढण्यात आला. त्या पट्ट्यातील रक्तवाहिन्या मायक्रोस्कोपचा उपयोग करून मायक्रोव्हॅस्क्युलर तंत्राने प्रकोष्ठाच्या रक्तवाहिन्यांशी जोडण्यात आल्या. सापाच्या मस्क्युलोटॉक्सिक विषाने ऊती आणि रक्तावाहिन्यां ऊती आणि रक्तवाहिन्यांवरही व्रण निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकरणात तांत्रिक आव्हान व जोखीम काकणभर अधिक होती.", अशी पुष्टी डॉ. सातभाई यांनी जोडली.

वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, "अशा शस्त्रक्रियांसाठी मायक्रोव्हॅस्क्युलर कौशल्य, अतिदक्षता आरोग्यसेवेचे पाठबळ आणि लॉजिस्टिकल आवश्यकता या मर्यादा असतात. या शस्त्रक्रियेसाठी लागणी सर्व मायक्रोव्हॅस्क्युलर उपकरणे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वाडिया रुग्णालयात कमी खर्चात उपलब्ध आहेत. ताल्हाला नवसंजीवनी देणारी शस्त्रक्रिया आम्ही येथे करू शकलो, याचा आम्हाला आनंद आहे."

महेताब शेख (वडील) म्हणतात, आम्ही त्याला येथे आणले तेव्हा त्याचा हातामध्ये पूर्ण व्यंग निर्माण झाले होते. त्याला कोणतीही वस्तू पकडता येत नव्हती आणि तो हाताची मूठही करू शकत नव्हता. पण आता जखम भरली आहे आणि फिजिओथेरपीनंतर हाताची हालचाल होऊ लागली आहे."

Web Title: Mumbai : successful microvesicular hand surgery on 8 year old child at Wadia hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.