मुंबई, ठाणे आणि कल्याणकरांचे प्रदूषणाने हाल
By सचिन लुंगसे | Published: December 29, 2023 06:07 PM2023-12-29T18:07:05+5:302023-12-29T18:07:21+5:30
फॉग मशीन किंवा स्मॉग टॉवरचा किंवा पाऊस पाडण्याचा प्रयोग करणे हे अतिशय महागडे आहे.
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सेवा सुविधांची कामे, वेगाने उभ्या राहत असलेल्या गगनचुंबी इमारती, सातत्याने वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटच्या प्रदूषणाने मुंबईकरांचे २०२३ हे वर्ष धुळीने माखले. रस्त्यांच्या कामांसह इमारतींच्या कामांनी यात अधिक भर घातली आणि उन्हाळ्यासह हिवाळ्यातील अधिकाधिक दिवस मुंबईत नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणाने मुंबईकरांचा श्वास आजही कोंडल्याचे चित्र आहे.
फॉग मशीन किंवा स्मॉग टॉवरचा किंवा पाऊस पाडण्याचा प्रयोग करणे हे अतिशय महागडे आहे. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रदूषण आढळते. हिवाळ्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनी जवळ येत. वाऱ्याची गतीसुद्धा अगदी कमी असते. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असते. - प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी
प्रदूषणाची कारणे
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि इतर उद्योग
उपाय
झाडे लावणे, सायकलचा व सार्वजनिक वाहने वापरणे, बॅटरीवर चालणारी वाहने उपयोगात आणणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा जाळू नये.
कल्याण
३६५ दिवसांपैकी २१९ दिवस जास्त प्रदूषण
६ दिवस चांगले
१४९ दिवस समाधानकारक
१८८ दिवस साधारण प्रदूषित
३० दिवस जास्त प्रदूषित
१ दिवस अत्यंत प्रदूषित
ठाणे
३६५ पैकी २५२ दिवस जास्त प्रदूषण
४२ दिवस चांगले
७१ दिवस समाधानकारक
२११ दिवस साधारण प्रदूषण
४१ दिवस जास्त प्रदूषित
मुंबई
३६५ पैकी १९४ दिवस प्रदूषण
२ दिवस चांगले
१६९ दिवस समाधानकारक
१५६ दिवस साधारण प्रदूषण
३७ दिवस जास्त प्रदूषित
१ दिवस अत्यंत प्रदूषण
नवी मुंबई
३६५ पैकी २०२ दिवस प्रदूषण
६२ दिवस चांगले
१०१ दिवस समाधानकारक
११४ दिवस साधारण प्रदूषण
६८ दिवस जास्त प्रदूषण
१६ दिवस अत्यंत प्रदूषण
३ दिवस घातक प्रदूषण