Join us

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत १०० ते ७० मिलीमीटर पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 2:23 PM

मान्सूनचा धमाका

मुंबई : मंगळवारसह बुधवारी मुंबईला झोडपून काढणा-या पावसाची गुरुवारी सकाळी ८ वाजता १०८.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. सलग दोन दिवस कोसळलेल्या मुसळधारने गुरुवारी मात्र विश्रांती घेतली; आणि मुंबईकरांची सकाळ सुर्यनारायणाच्या दर्शनाने झाली. मुंबईवर दाटून आलेले पावसाचे ढग गुरुवारी दूरवर गेल्याने मुंबईत दिवसभर ब-यापैकी ऊन्हाने खेळ मांडल्याचे चित्र होते.  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत १०० ते ७० मिलीमीटरदरम्यान पाऊस नोंदविण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री मुंबईत तुफान पाऊस पडला. यामुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. बुधवारी पाऊस लागून राहिला असला तरी त्याचे प्रमाण कमी होते. परिणामी फार कोठे पाणी साचले नाही. गुरुवारी तर पावसाने ब-यापैकी उघडीप घेतली. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसामुळे जेथे पाणी साचले होते त्या पाण्याचा निचरा पुर्णत: करण्यात आला. पावसाने विश्रांती घेतली असली तरी एकूण ६ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. २० ठिकाणी झाडे कोसळली. ३४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर मुंबई हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. १०० ते ७० मिलीमीटरदरम्यान हा पाऊस नोंदविण्यात आला आहे.१९९३ ते २०२० दरम्यानच्या नोंदी (मिमी)२३ सप्टेंबर १९९३ : ३१२.४२० सप्टेंबर २०१७ : ३०३.७२३ सप्टेंबर २०२० : २८६.४५ सप्टेंबर २०१९ : २४२.२४ सप्टेंबर २०१२ : १८५.३२०२० मधील मोठे पाऊस (मिमी)२२-२३ सप्टेंबर : २८६.४३-४ ऑगस्ट : २६८.६१४-१५ जुलै : १९१.२४-५ जुलै : २००.८३-४ जुलै : १५७२०२० : महिन्यानुसार पाऊस (मिमी)महिना : पाऊसजुन : ३९५जुलै : १५०२ऑगस्ट : १२४०सप्टेंबर : ५२८आतापर्यंत अधिकचा पाऊस (टक्क्यांत)शहर ६१उपनगर ६७राज्य १८वर्ष निहाय नोंदी (मिमी)१९५८ : ३७५९२०१९ : ३६७०२०२० : ३६६६१९५४ : ३४५१२०१० : ३३२७२०११ : ३१५४२०१७ : २९४६२०१६ : २८९४२०१३ : २४३३२०१४ : २२९९१९८६ : १३४१

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामानमुंबई महानगरपालिका