अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 19 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, कोकणातल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:39 AM2019-09-19T00:39:06+5:302019-09-19T01:17:10+5:30
पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे.
मुंबई : जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला असून, प्रवासातही तो रौद्र स्वरूप धारण करणार आहे. 19 सप्टेंबरला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे उद्या मुंबईसह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील शाळा उद्या बंद राहणार आहेत.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, जळगाव व सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. याच दिवशी कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मुंबई व ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर २० सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्रासह मध्य भारतात १८ ते २३ सप्टेंबर या काळात पावसाचा जोर वाढेल. उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.दि.19 सप्टेंबर रोजी कोंकण ,ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
— ashish shelar (@ShelarAshish) September 18, 2019
In view of heavy rainfall forecasts. As a precautionary measure, holiday is declared for all schools & junior colleges in Mumbai, Thane, Konkan region for today 19 Sep 2019. District collectors in other parts of Maharashtra to decide, based on local conditions. #rain
— ashish shelar (@ShelarAshish) September 18, 2019