मुंबई : राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच ३ आणि ४ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला.
पालघर आणि ठाणे येथे ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर रायगडमध्येदेखील ३ आणि ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे ३, ४ आणि ५ जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. गुजरात व लगतच्या परिसरासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार ३ जुलै रोजी रत्नागिरी, तर ४ जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केले आहे.मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसणारजुलै महिन्यात कोकणासह महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. येत्या २४ तासांत ठाणे, पालघर आणि मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथे मुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ३ आणि ४ जुलै रोजी पावसाचा जोर वाढेल. ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस पडेल.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग