मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 02:01 PM2024-11-17T14:01:18+5:302024-11-17T14:02:08+5:30

सोनाली यांनी आईला फोन केला असता त्यांचे सर्व कॉल डायव्हर्ट केल्याचे समजले.

Mumbai: The actor's wife received a message; How did the cyber thug do it? | मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

मुंबई : फेक मेसेज पाठवत सोनाली मल्होत्रा (३४, रा. खार पश्चिम) यांना हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आला. त्यांना हा मेसेज त्यांच्या आईच्या मोबाइल नंबरवरून पाठवण्यात आला होता. याप्रकरणी खार पोलिसांनी औरंगजेब नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, सोनाली यांचे पती करणवीर हे अभिनेते आहेत.

सोनाली या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये कन्सल्टंट आहेत. त्यांच्या आई भोपाळमध्ये राहत असून तिथेच त्यांचा आर्टवर्कचा व्यवसाय आहे. आर्थिक गरज असल्यास सोनाली यांना त्या व्हाट्सॲपवरून मेसेज पाठवत तसे सांगतात आणि सोनाली त्यांना पैसे पाठवतात. 

तक्रारीनुसार, १५ नोव्हेंबरला दुपारी त्यांना आईच्या मोबाइलवरून औरंगजेब नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ६५ हजार रुपये पाठवण्याबाबत मेसेज आला. आईचा नंबर असल्याने सोनाली यांनी थेट ते पैसे पाठविले. त्यानंतर पुन्हा ३० हजारांची मागणी करण्यात आली. मात्र मेसेज हा इंग्रजी आणि हिंदी अशा मिश्र भाषेत असल्याने त्यांना शंका आली. 

सोनाली यांनी आईला फोन केला असता त्यांचे सर्व कॉल डायव्हर्ट केल्याचे समजले. आईकडे काम करणाऱ्या नोकराच्या मोबाइलवर त्यांनी फोन केला. तेव्हा अनेकांना पैसे मागण्यासाठी मेसेज पाठवण्यात आल्याचे तिने सोनालीला सांगितले. ही बाब समजल्यानंतर सोनाली यांनी खार पोलिसांत तक्रार दिली. 

Web Title: Mumbai: The actor's wife received a message; How did the cyber thug do it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.