Mumbai: भाटी गावातील शेकडो वर्षे जुनी हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन गेले न्यायालयात!

By मनोहर कुंभेजकर | Published: July 25, 2023 03:56 PM2023-07-25T15:56:47+5:302023-07-25T15:57:06+5:30

Mumbai: वेळोवेळी आमदार व खासदार निधीतून या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ही जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात गेले आहे. ही शरमेची बाब आहे, अशी भूमिका मांडत शासनाने याबाबतीत सविस्तर खुलासा करण्याची मागणी माजी मंत्री व मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.

Mumbai: The government went to court to demolish the hundreds of years old Hindu cemetery in Bhati village! | Mumbai: भाटी गावातील शेकडो वर्षे जुनी हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन गेले न्यायालयात!

Mumbai: भाटी गावातील शेकडो वर्षे जुनी हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन गेले न्यायालयात!

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
  मुंबई - मालाड- पश्चिम, भाटी कोळ्यावाड्यात १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी हिंदू स्मशानभूमी आहे. १९५५ साली मालमत्ता पत्रक व सात-बारा स्मशानभूमीच्या नावावर करण्यात आले. वेळोवेळी आमदार व खासदार निधीतून या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ही जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्यासाठी शासन न्यायालयात गेले आहे. ही शरमेची बाब आहे, अशी भूमिका मांडत शासनाने याबाबतीत सविस्तर खुलासा करण्याची मागणी माजी मंत्री व मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.याबाबत लोकमतने वृत्त दिले होते.

एक अनधिकृत बंगलाधारक, हॉटेलधारक न्यायालयात जाते व न्यायालयाची दिशाभूल करुन हिंदू स्मशानभूमी तोडायला भाग पाडतो. मात्र त्यानंतर या कारवाई विरोधात गावकरी न्यायालयात गेले  व  सर्व वस्तुस्थिती न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. न्यायालयाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यास रु २ लाखांचा दंड ठोठावला व शासनास दोन महिन्यांच्या आत स्मशानभूमी बांधून देण्याचे आदेश दिले.

महानगरपालिकेने स्मशानभूमी बांधून दिल्यानंतर शासनाने पुन्हा पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. वर्षानुवर्ष जुनी असलेली हिंदू स्मशानभूमी तोडण्याचा घाट का घातला जातोय, असा संतप्त सवाल अस्लम शेख यांनी विचारला. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय संवेदनशील असल्याचे सांगत लवकरच निर्णय देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Mumbai: The government went to court to demolish the hundreds of years old Hindu cemetery in Bhati village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई