Join us

Mumbai: मुंबईचा समुद्र चार महिने खवळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:09 PM

Mumbai: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर टेहळण्यात एक वेगळीच मजा असते. सध्या उन्हाळा असला तरी मुंबईतील किनाऱ्यावर सकाळी, संध्याकाळी मुंबईकर एन्जॉय करताना दिसतात.

मुंबई : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर टेहळण्यात एक वेगळीच मजा असते. सध्या उन्हाळा असला तरी मुंबईतील किनाऱ्यावर सकाळी, संध्याकाळी मुंबईकर एन्जॉय करताना दिसतात. मात्र पावसाळ्यात मुंबईकरांना किनाऱ्यावर बागडता येणार नाही. कारण जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात समुद्र खवळणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्याला धडकणार आहेत.

मुंबईचा फेसाळलेला समुद्र आणि किनाऱ्यावर वाहणारा वारा अंगावर झेलण्यासाठी मुंबईकर किनाऱ्यावर कुटुंबासह गर्दी करतात. मात्र, विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मुंबईकरांची संख्या जास्त असते. पावसाळ्यात समुद्र किनाऱ्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मरिन ड्राइव्ह, वरळी, जुहू सह वेसावे, मार्वे, गोराई येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात रौद्ररूप धारण करणार असून साडेचार मीटर उंची पेक्षा जास्त उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पालिकेने २५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.हे आहेत भरतीचे दिवस

दिनांक    वेळ    लाटांची उंची४ जून    १२:१६ वा.    ४.६२ मीटर५ जून    १३:०१ वा.    ४.६९   मीटर६ जून    १३:४७ वा.    ४.६९  मीटर७ जून    १४:३५ वा    ४.६४ मीटर८ जून    १५:२५ वा    ४.५१ मीटर३ जुलै    १२:२ वा.    ४.६० मिटर ४ जुलै    १२:४९ वा.    ४..७२ मीटर५ जुलै    १२:३६ वा.    ४.७८ मीटर६ जुलै    १२:२३ वा.    ४.७७ मीटर७ जुलै    १२:१० वा.    ४.६९ मीटर८ जुलै    १२:५५ वा.    ४.५२ मीटर१ ऑगस्ट    ११:४६ वा.    ४.५८ मीटर२ ऑगस्ट    १२:३० वा.    ४.७६ मीटर 

दिनांक    वेळ    लाटांची उंची३ ऑगस्ट    १३:१४ वा.    ४.८७  मीटर४ ऑगस्ट    १३:५६ वा.    ४.८७ मीटर५ ऑगस्ट    ४:३८ वा    ४.८७ मीटर६ ऑगस्ट    १५:२० वा.    ४.५१ मिमी३० ऑगस्ट    ११:२६ वा.    ४.५९ मिमी३१ ऑगस्ट    १२:०६ वा.    ४.८० मीटर१ सप्टेंबर    १२:४४ वा.    ४.८८ मीटर२ सप्टेंबर    १३:२२ वा.    ४.८४ मीटर३ सप्टेंबर    १:५२ वा.    ४.६४ मीटर२८ सप्टेंबर    ११ वा.    ४.५६ मीटर२९ सप्टेंबर    ११:३७ वा.    ४.७१ मीटर३० सप्टेंबर    ८ वा    ४.७४ मीटरसमुद्राला उधाण येणार असल्याने मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफसह इतर यंत्रणाही तैनात केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :मुंबईपाऊस