Join us

Mumbai: स्वामी मुक्तानंद हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी बनविले भरड धान्याचे पदार्थ 

By सीमा महांगडे | Published: February 28, 2023 1:54 PM

Mumbai: चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरड धान्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन भरवून भारतीय आहाराकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : शरीराला महत्वपूर्ण असलेला पोषक आहार बाजूला सारून युवा पिढी फास्ट फूड च्या आहारी गेली असून त्यापासून या पिढीला दूर करून शरीराला पोषक असलेला आहार म्हणजे भरड धान्य असून, चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरड धान्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन भरवून भारतीय आहाराकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात व उपमुख्याध्यापक आप्पासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या मदतीने हे पदार्थ शाळेत आणले होते.

आयवायओएम अर्थात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्याच्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर या धान्यांच्या उत्पादनात वाढ, कार्यक्षम प्रक्रिया  तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून भरड धान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. या वर्षाचे औचित्य साधून आज शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये ज्वारी पासून बनविलेले ज्वारीचे थालीपीठ, दलिया, कढी, बाजरीची खिचडी, कळण्याची भाकर, राजगिर्याची पुरी, भाकर, चिक्की, इडली, पराठा तर राळ्याचे डोसे, कटलेट, सांजोऱ्या, भात बार्लीचे खिचडी, स्मूदी, लापशी वरई ची खीर, शिरा, भात अप्पे यासह अनेक पदार्थ बनविले होते.

टॅग्स :मुंबईविद्यार्थीअन्न