मुंबईत तळीराम चालक वाढले
By admin | Published: July 5, 2016 02:06 AM2016-07-05T02:06:45+5:302016-07-05T02:06:45+5:30
दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून, कठोर कारवाई होऊ शकते, याची माहिती असूनही दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. अशा ‘तळीराम’
मुंबई : दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून, कठोर कारवाई होऊ शकते, याची माहिती असूनही दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. अशा ‘तळीराम’ चालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असून, त्यात तळीराम चालकांची संख्या वाढल्याचेच समोर आले आहे. २0१६मध्ये तळीराम चालकांविरोधात केलेल्या कारवाईत २ हजार ६४२ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मागील वर्षाशी तुलना केल्यास यंदाच्या सहा महिन्यांतच सर्वाधिक परवाने निलंबित झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
दारू पिऊन वाहन चालविल्याने अनेक अपघातांच्या घटनांना सामोरे जावे लागते. तळीराम चालकाच्या चुकीमुळे त्या चालकाबरोबरच पादचारी किंवा अन्य वाहनांमधील चालक तसेच प्रवाशालाही प्राण गमवावे लागतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. त्यासाठी विशेष मोहीमही हाती घेण्यात येते. जर एखाद्या तळीराम चालक आढळल्यास त्याला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करून जास्तीतजास्त दंड आकारण्यात येतो. मात्र मोठा दंड आकारूनही चालकाकडून पुन्हा तोच गुन्हा केला जातो. त्याच्याकडून वारंवार गुन्हा घडल्यास किंवा एखादा मोठा अपघात झाल्यास त्याचे प्रमाण पाहून अखेर परवानाही निलंबित केला जात असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
२0१६मधील जानेवारी ते जूनपर्यंत १२ हजार ४६६ केसेसची नोंद झाली आहे. त्यात २ हजार ६४२ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २0१५मध्ये तळीराम चालकांच्या १७ हजार ८४९ केसेस दाखल झाल्या होत्या आणि १ हजार ८२६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. यंदाच्या वर्षात पाहिल्यास सहा महिन्यांतच केसेस आणि परवाना निलंबनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येईल. (प्रतिनिधी)
जानेवारी ते जून २0१६ पर्यंत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर केलेली कारवाई
महिनाकेसेसपरवाना
निलंबित
जानेवारी२,१५0४६६
फेब्रुवारी१,९९४४३७
मार्च२,६६७५७२
एप्रिल१,८९२३३२
मे१,९८७३१३
जून१,७७६५२२
एकूण१२,४६६२,६४२