मुंबई : मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल केले. मात्र, त्यांची तहान भागविली आहे. तलाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ९७ टक्के जलसाठा जमा झाला आहे.या वर्षी तलाव परिसरात पावसाने सुरुवातीपासूनच चांगला जोर धरला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पंधरवड्यातच मोडक सागर, तानसा, तुळशी तलाव भरून वाहू लागले. त्यानंतर, पावसाने मोठी विश्रांती घेतली. मात्र, गेल्या मंगळवारी मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. त्यामुळे सर्व तलाव काठोकाठ भरली असून, एकूण १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे.असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)२०१७ - १४ लाख ५ हजार२०१६ - १३ लाख ८० हजार२०१५ - ९ लाख ९१ हजारमुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलक्ष लीटर्स एवढी आहे.दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० दशलक्ष लीटर्स पाणीगळती व चोरीमध्ये वाया जात आहे.
पावसाने भागविली मुंबईची तहान! ९७ टक्के जलसाठा जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:57 AM