मुंबईवर हल्ल्याचा धोका कायम, गुप्तचर यंत्रणेचा इशारा, दाऊद टोळीकडून घातपाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 06:27 AM2017-11-26T06:27:31+5:302017-11-26T06:27:53+5:30

नऊ वर्षांपूर्वीच्या २६/११ च्या घटनेनंतर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासह सुरक्षेच्या दृष्टीने विविध सतर्कतेच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर अजूनही अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे.

Mumbai threatens to strike, detective alert, Dawood gang injuries | मुंबईवर हल्ल्याचा धोका कायम, गुप्तचर यंत्रणेचा इशारा, दाऊद टोळीकडून घातपाताची शक्यता

मुंबईवर हल्ल्याचा धोका कायम, गुप्तचर यंत्रणेचा इशारा, दाऊद टोळीकडून घातपाताची शक्यता

Next

- जमीर काझी

मुंबई : नऊ वर्षांपूर्वीच्या २६/११ च्या घटनेनंतर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासह सुरक्षेच्या दृष्टीने विविध सतर्कतेच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर अजूनही अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. नऊ वर्षांपूर्वीच्या हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ हाफीज सईदची पाकने मुक्तता केल्यानंतर तो पुन्हा भारताविरोधात आग ओकत आहे, तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील कोट्यवधींच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आल्याने तो संतापला आहे. त्यामुळे दहशतीसाठी त्याच्याकडून पुन्हा घातपाती कृत्य घडविण्याचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

ताकद दाखविण्याचा प्रयत्न
दाऊदचा लहान भाऊ इकबाल कासकर व त्याचे साथीदार गेल्या अडीच महिन्यांपासून खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून डी गँॅगची अनेक महत्त्वपूर्ण गुपिते उघडकीस आली आहेत. त्याचबरोबर दाऊदच्या दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील हॉटेल अफरोजसह तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. या दोन घटनांमुळे दाऊद व त्याचे साथीदार संतप्त झाले असून आपली ताकद दाखविण्यासाठी त्यांच्याकडून घातपाती कृत्य, संघटित गुन्हे घडविण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- ‘२६/११’चा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाकने नुकतेच मुक्त केल्यानंतर त्याने पुन्हा काश्मीरबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. पूर्ण भारतात अशांतता पसरवायची असल्यास मुंबईला ‘टार्गेट’ करणे, हा अतिरेक्यांचा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे.
- मुंबईतील सर्व प्रमुख ठिकाणांसह बहुतांश भागावर सीसीटीव्हीची नजर आहे. पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. मात्र तरीही मुंबईकरांनी जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
- कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती, घटनांबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्या,
असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.

मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सज्ज आहे. मात्र नागरिकांनीही जागरूकता दाखवीत संशयास्पद व्यक्ती, वस्तू आढळल्यास त्याबाबत तत्परतेने माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे.
- दत्ता पडसलगीकर
(मुंबईचे पोलीस आयुक्त)

Web Title: Mumbai threatens to strike, detective alert, Dawood gang injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई