लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सोमवारी ७२० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७१ हजार ३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा होण्याचा कालावधी ३७४ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ८ हजार १७८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर, उपनगरात २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २३ लाख ११ हजार ५०३ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५५७ रुग्ण आणि १२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ९१ हजार ४७१ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ८८ झाला आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २८० असून २ हजार ४७५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार २४८ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.
* मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोविड सेराे सर्वेक्षण सुरू केले असून यामधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू हाेईल. त्यामुळे हा सर्व्हे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आयसीएमआरने घेतला आहे. गुरुवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत हे पूर्ण करण्यात येणार आहे.
--------------------